Close

महाबळेश्वर तालुका

श्रेणी अॅडवेन्चर, ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक/मोहक सौंदर्य, मनोरंजक

महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा तो निसर्गरम्य परिसर होय. जुने महाबळेश्वर व नवे महाबळेश्वर असे महाबळेश्वराचे दोन भाग करण्यात आले आहेत. मधील भाग ब्रम्हारण्याने व्यापला असून दोन्ही भागंामध्ये ५ कि. मी.चे अंतर आहे.

महाबळेश्वर –

समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण व पर्यटनाचे महत्वाचे केंद्र कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्या येथून उगम पावतात. या पंचगंगेचे येथे देऊळ आहे. वेण्णा तलावात नौकाविहाराची सोय आहे. वनखात्यातर्फे पर्यटकांसाठी वनसहलीचे आयोजन करण्यात येते. येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजाने तेराव्या शतकात बांधले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले. विल्सन पॉईंट व माखरिया पॉईंट, केल्स पाँईंट, एको पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, विडो पॉईंट,कसल रॉक व सावित्री पॉईंट, मार्जोरी पॉईंट, एल्फिन्स्टन पॉईंट, कॅनॉट पीक हंटर पॉईंट,नॉर्थकोर्ट पॉईंट, लॉडविक पॉईंट, बॉम्बे पॉईंट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फाकलेड पॉईंट इ.पॉईंट आहेत. निसर्गाचे विविध रुपे पाहण्यासाठी या ठिकाणी सामान्यापासून ते पदाधिकार्‍यांपर्यंत अनेक व्यक्ती येतात. महाबळेश्वरास बालकविनी घिनसर्गदेवतेला पडलेले सुंदर स्वप्नङ असे म्हटले आहे. या ठिकाणी मधुसागर मधुमक्षिका पालन केंद्र आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे मध उपलब्ध होतात. विल्सन पॉईंट जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते. तसेच महाबळेश्वर-पाचगणी येथे स्ट्रॉबेरी, राजबेरी, तुतू, जांभूळ इत्यादी फळांचे उत्पादन मोठया प्रमाणात करण्यात येते.

महाबळेश्वर

महाबळेश्वर

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी

क्षेत्र महाबळेश्वर –

यालाच धोम महाबळेश्वर असेही म्हणतात. येथील एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. इ.स. सन १२१५ मध्ये यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्या उगम पावल्या आहेत. या मंदिरामुळेच याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. एकतपाच्या तीर्थाटनानंतर इ. स. १६४४ साली समर्थ रामदास स्वामींनी सर्व प्रथम येथे येवून धर्मउपदेश देण्यास सुरुवात केली. येथेच त्यांनी पहिले मारुतीचे मंदिर बांधले.

क्षेत्र महाबळेश्वर

क्षेत्र महाबळेश्वर

विल्सन पॉईंट –

महाबळेश्वर मधील महत्वाचा व उंच पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट या पॉईंटवर तीन बुरुज आहेत.पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्‍याचा आसमंत दिसतो. दुसर्‍या बुरुजावर प्रातःकाली आलयास सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. तसेच पूर्वेला पाचगणी दिसते. तिसर्‍या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्ण नदीचे खोरे दिसते.

विल्सन पॉईंट

विल्सन पॉईंट

बॉम्बे पॉईंट –

जुन्या मुंबई रस्त्याजवळ हा पॉईंट असल्याने याला बॉम्बे पॉईंट हे नाव पडले. पर्यटकांच्या सर्वात आवडत्या पॉईंट पैकी हा एक पॉईंट आहे. अस्ताला जाणा-या सूर्याचे दर्शन हे या पॉईंटचे खास आकर्षण आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर या पॉईंट जवळ भरपूर गर्दी होते. क्गांच्या संख्येनुसार येथे सूर्य मावळताना त्याचा आकार लंबगोल, घागरीसारखा, चौकोनी, पतंगाकृती असा वेगवेगळा होत असतो. यालाच सनसेट पॉईंट म्हणतात.

बॉम्बे पॉईंट

बॉम्बे पॉईंट –

हत्तीचा माथा –

याचे अंतर सहा कि.मी. एवढे आहे. पर्वत शिखरांचे हे पश्चिमेकडील सर्वात लांबचे टोक आहे. याची रुंदी ३.७ मीटर असून याची खोली खलच्या कोयना खोर्‍यापर्यंत सुमारे ८०० मीटर इतकी आहे. त्यामुळे या पॉईंटचा आकार हत्तीचा माथा आणि सोंडेसारखा दिसतो. हत्तीच्या माथ्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात. समोर प्रतापगड अगदी स्पष्ट दिसतो. तसेच जावलीच्या घनदाट अरण्यात लपलेले जावली गाव दिसते.

हत्तीचा माथा

हत्तीचा माथा

ऑर्थर सीट व विडो पॉईंट –

महाबळेश्वरच्या कड्यावरती असलेला ऑर्थर सीट नावाचा सर्वात प्रेक्षणीय असा पाईंट आहे. ऑर्थर मॅलेट याच्या स्मरणार्थ या पॉईंटला हे नाव देण्यात आले आहे. या कड्यावरुन डाव्या बाजूला सावित्रीच्या खोर्‍याचे खोल कडे दिसतात. तर उजव्या बाजूला जोर खोर्‍याचे घनदाट अरण्य दिसते. सर्वत्र खाली दूरवर पर्वत शिखरे दिसतात. तोरणा, रायगड, कांगारी हे किल्ले दिसतात. शिखरे तरंगणार्‍या ढगांनी झाकलेली दिसतात. ऑर्थर सीटकडे जाताना टायगर स्प्रिग नावाचा झारा लागतोयेथे सर्व ऋतुत पाण्याचा प्रवास वाहतो. सावित्रीनदीचा गुप्त प्रवाह येथे प्रकट होतो. ऑर्थर सीट पासून खाली २०० फुट अंतरावर विडो पॉईंट आहे. येथे दगडांची खिडकीसारखी नैसर्गिक रचना पहावयास मिळते. या खिडकीतून निसर्गाचे अद्भूत दर्शन घडते

ऑर्थर सीट व विडो पॉईंट

ऑर्थर सीट व विडो पॉईंट

वेण्णा लेक व प्रतापसिह उद्यान –

महाबळेश्वर पाचगणी रोडवर २.५ कि.मी. अंतरावर वेण्ण नदीचे पाणी साठलयाने निर्माण झालेला वेण्ण तलाव आहे. येथे पर्यटकांना नौका नयन व जलविहाराचा आनंदही घेता येतो. घोड्यावरुन रपेटही मारता येते. या तलावाच्या मागे घनदाट अरण्यही आहे. तर शेजारी रस्त्याला लागूनच प्रतापसिह उद्यान आहे. तेथे अनेक शोभिवंत फुलझाडे आणि वृक्ष आहेत.

वेण्णा लेक व प्रतापसिह उद्यान

वेण्णा लेक व प्रतापसिह उद्यान

महाबळेश्वर पाचगणी रोडवर २.५ कि.मी. अंतरावर वेण्ण नदीचे पाणी साठलयाने निर्माण झालेला वेण्ण तलाव आहे. येथे पर्यटकांना नौका नयन व जलविहाराचा आनंदही घेता येतो. घोड्यावरुन रपेटही मारता येते. या तलावाच्या मागे घनदाट अरण्यही आहे. तर शेजारी रस्त्याला लागूनच प्रतापसिह उद्यान आहे. तेथे अनेक शोभिवंत फुलझाडे आणि वृक्ष आहेत.

वेण्णा लेक व प्रतापसिह उद्यान 2

वेण्णा लेक व प्रतापसिह उद्यान 2

पाचगणी –

सह्याद्रीच्या माथ्यावर टेबललँड प्रमाणेच पाच टेकडया आहेत. या भागालाच पाच गडांची भूमी पांचगडी व त्याचा भ्रंश होऊन पाचगणी असे नांव पडले आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना टेबललँडचे विशेष आकर्षण आहे. थंड कोरड्या व उत्साहवर्धक हवामानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते त्यामुळे पाचगणीला आरोग्य धाम असे म्हणण्यात येते.
पाच डोंगरावर वसलेले गाव म्हणून पाचगणी. थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर लौकिकास आले आहे. प्रेक्षणीय विविध पाईंटस, भिलार टेबललँड, किडीज पार्क आहेत. शिवाय मॉरल रिआर्मामेंट सेंटर आहे. येथे देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गुरेघर येथे मॅप्रो फ्रुट प्रॉडक्टस ही जाम फॅक्टरी ८ एकर परिसरात आहे. तेथील ग्रीन हाऊसमध्ये शेकडो प्रकारचे कॅक्टस पहायला मिळतात.

पाचगणी

पाचगणी

प्रतापगड –

महाबळेश्वर-महाड रस्त्यावर महाबळेश्वर पासून २० कि. मी. अंतरावर प्रतापगड आहे. १६५७ मध्ये मोरोपंत पिगळे यांनी हा किल्ला बांधून घेतला. गडाच्या मध्यावर भवानी मातेचे दगडी मंदीर आहे. देवीची काळया पाषाणाची मुर्ती आहे. जवळच बालेकिल्ल्यात केदारेश्वराचे मंदीर आहे. त्यावर शिवाजी महाराजांची सदर व जिजामाता वाड्याचे अवशेष दिसतात. प्रतापगडाच्या जवळच कडेलोट पॉईंट आहे. तेथून दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे. याकड्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात. प्रतापगडाच्या डोंगराला पूर्वी भोरप्याचा डोंगर असे म्हणत. या गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६५६ साली प्रतापगड बांधला. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी व अफजलखान यांची ऐतिहासिक भेट होऊन त्यात अफजलखानाचा वध झाला. गडावर शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर व शिवछत्रपतींचा भव्य अश्वारुढ पुतळा असून गडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे.

प्रतापगड

प्रतापगड

मकरंदगड –

याला सॅडल बँक असेही म्हणतात कारण याचा आकार तट्टूच्या पाठीसारखा आहे. वासोटा आणि प्रतापगड यांना जोडणारा हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.च्या १६५६ च्या सुमारास बांधला. या गडाचे वैशिष्ठ म्हणजे या गडाच्या एका बाजूने महाबळेश्वर दिसते तर दुसर्‍या बाजुने कोकण प्रांताचे आणि समुद्र किनार्‍याचे विलोभणीय दर्शन दुर्बिणीच्या साहय्याने घेता येते. या गडाभोवती जवळचे घनदाट अरण्य पसरलेले असून त्यात हिस्र श्वापदांची वस्ती आहे. गडाच्या माथ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली मल्लिकार्जुन शंकराचे मंदीर आहे. त्याची दरसाली यात्रा भरते.

केंजळगड –

हा किल्ला १२ व्या शतकात राजा भोज यांनी बांधला. या गडावर पूर्वेला एक महादेवाचे व देवीचे मंदीर पडलेल्या अवस्थेत आहेत. या किल्ल्यावरुन पांडवगड, कमलगड, रायरेश्वरपठार, चंदनवंदन, धोम धरण दिसते.

मालाज फुड प्रॉडक्ट –

भोसे या खेडेगावात मालाज फुड प्रॉडक्ट नावाची कंपनी आहे. येथे विविध फळांचे जाम जेली मार्मालेडस्, क्रशेस व सिरपचे उत्पादन केले जाते. मधाच्या बाटल्याही मिळतात.

मॅप्रो फुड प्रोडक्ट –

गुरेघर येथे ही जामची फॅक्टरी आहे. हा कारखाना आठ एकर परिसरात आहे. तेथील ग्रीन हाऊसमध्ये शेकडो प्रकारचे कॅक्टस् पहावयास मिळतात. विविध रंगी व आकाराची गुलाबपुष्पे व इतर प्रदर्शनीय आकर्षक वनस्पती पहावयास मिळतात.

 

संपर्क तपशील

पत्ता: महाबळेश्वर तालुका