इतिहास
सातारा जिल्हा – ऎतिहासिक संदर्भ :
सातारा जिल्हा मराठी राज्याची राजधानी होती.त्याचा विस्तार सुमारे १४लक्ष कि .मी. इतका होता. या भुमीला सांस्कृतीक वारसा लाभलेला आहे. जिल्हयातील कित्येक थोर योध्दे,राजे,संत आणि थोर व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला आहे.
ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे. दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते.
