Close

भवानी संग्रहालय, औंध

फिल्टर:

श्री.भवानी संग्रहालय, औंध (जि.सातारा)

कै.श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब महाराज पंतप्रतिनिधी (औंधचे राजे )हे उत्तम कलाप्रेमी आणि स्वतः एक कलाकार होते.त्यांनी अनेक कला चित्रांचा,शिल्पकलेच्या भांड्यांचा,शस्त्रास्त्रांचा आणि धार्मिक पुस्तकांचा संग्रह करून ठेवलेला आहे.सर्व सामान्य जनतेला या सर्वांचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी सन १९३८ साली श्री.भवानी संग्रहालय व ग्रंथालयाची स्थापना केली.संग्रहालयात ८००० पेक्षा अधिक वस्तूंचा आणि १६००० पुस्तके त्यापैकी ३५०० धार्मिक पुस्तके(हस्तलिखित) आदींचा समावेशआहे.श्रीमंत बाळासाहेब महाराजांनी संग्रह्शास्त्राचा अभ्यास करून परदेशी वास्तुशास्त्रज्ञांच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाश ,खेळती हवा आणि संरक्षण या गोष्टी विचारात घेऊन सध्याची संग्रहालयाची इमारत स्थापन केली.जिल्ह्यातील ग्रामीण भागांत इतक्या मोठ्या प्रमाणात विविध शिल्पांचे,आणि वस्तू संग्रहित करणे म्हणजे एक प्रकारे नवलच वाटण्यासारखे आहे. संग्रहालयाची निसर्गरम्य इमारत औंधच्या टेकडीच्या पायथ्याशी स्थित असून,सुप्रसिद्ध ‘यमाई देवी’चे मंदिर टेकडीच्या माथ्यावर सुमारे  ८०० फुट उंचीवर आहे.औंध हे उत्तम प्रकारच्या रस्त्यांनी जोडलेले असून सातारा जिल्ह्यापासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे.

 

भवानी संग्रहालय, औंध   <–चित्र प्रदर्शिनीची एक झलक बघण्यासाठी  येथे क्लिक करा.


संग्रहालयाच्या अधिक माहितीसाठी उप अभिरक्षकांना संपर्क साधा. फोन (०२१६१) २ ६२२२५.

संग्रहालय पाहण्याची वेळ स.१०.०० ते दु.१.०० आणि दु.१.३० ते सायं. ५.००, सोमवारी सुट्टी.


 

भाम्बवली वजराई धबधबा

भाम्बवली वझराई धबधबा

भाम्बावली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ…

भाम्बवली पुष्प पठार

भाम्बवली पुष्प पठार

भामबवली पुष्प पठार हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. हे सातारा शहरापासून अंदाजे 30 किमी दूर स्थित आहे. हे पठार उंच…

स्ट्राबेरी

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले…

दिशा
पाचगणीचे टेबल लॅन्ड

पाचगणी

पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ (१८ कि.मी.) अंतरावर असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण…

प्रतापगड किल्ला.

प्रतापगड

श्रेणी ऐतिहासिक

महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात…

तापोळा तलाव

तापोळा

तापोळा (बोट क्लब) महाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर सहलीसाठी आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना धरणातील शिवसागर…