Close

उपविभाग आणि विभाग

सातारा – प्रांतापासून जिल्ह्यापर्यंत

१९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात (पूर्वीचे सातारा प्रांत) ११ उपविभागे होती. त्यांची नावे याप्रमाणे बिजापूर (आता कर्नाटक राज्याचा भाग),जावळी,कराड,खानपूर,खटाव,कोरेगाव,पंढरपूर,सातारा, तासगाव, वाळवा आणि वाई – होती. १८५६ ला बारा नवीन महाले बनविण्यात आली.

>१९६२ ला उपविभागांच्या सीमेचे सर्वथा परीक्षण करण्यात आले. त्यानंतर खुप सारे बदल बघण्यात आले. काही तालुक्यांचे आणि उपविभांचे स्थानांतरण झाले. जसे पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आणि बिजापूर हे बेळगाव ला स्थानांतरीत झाले. १८८४ ला मालाकामपेठ पेटा (आताचे महाबळेश्वर) निर्माण झाले आणि १९२७ ला खंडाळा रद्द करण्यात आले, त्यानंतर १९४७ साली महाबळेश्वर आणि खंडाळा यांची पुनर्रचना करण्यात आली.

भारतात राज्यांच्या विलीनिकरनानंतर सातारा जिल्ह्याची पुनर्रचना झाली.

सातारा जिल्हा दोन भागात विभाजित होता.

दक्षिण सातारा याचे मुख्यालय सांगली येथे आणि उत्तर सातारा याचे मुख्यालय सातारा येथे होते.दोन्ही जिल्ह्यांचा बॉम्बे राज्यात समावेश करण्यात आला होता.

१९६० मध्ये उत्तर सातारा याचे नाव बदलून सातारा आणि दक्षिण सातारा याचे नाव सांगली  असे करण्यात आले. १९६१ च्या जनगणनेत सातारा येथे ९ तालुके, २ महाले आणि ११६० गावांचा समावेश होता.

उपविभागीय अधिकारी
तालुका एस. टी. डी. दूरध्वनी
सातारा २१६२ २३४२९५
कराड २१६४ २२१३७८
वाई २१६७ २२७७४४
फलटण २१६६ २२२३८६

दिनांक २६/०७/२०१३ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार नव्याने निर्माण करण्यात आलेले उपविभाग

उपविभागीय अधिकारी [दिनांक २६/०७/२०१३ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार]
तालुका एस. टी. डी. दूरध्वनी
कोरेगाव २१६३ २२१३००
पाटण २३७२ २८३१२२
मान-खटाव