Close

इतिहास

सातारा जिल्हा – ऎतिहासिक संदर्भ :

सातारा जिल्‍हा मराठी राज्‍याची राजधानी होती.त्‍याचा विस्‍तार सुमारे १४लक्ष कि .मी. इतका होता. या भुमीला सांस्‍कृतीक वारसा लाभलेला आहे. जिल्‍हयातील कित्‍येक थोर योध्‍दे,राजे,संत आणि थोर व्‍यक्तिमत्‍वांनी महाराष्‍ट्राचा इतिहास घडवला आहे.

ई.स.पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे .दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते.हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘ चालुक्य ‘ ,’ राष्ट्रकुट ‘,’ शिलाहार ‘, देवगिरीचे यादव ,’ बहामनी ‘ व ‘ आदिल शहा ‘,(मुस्लिम राज्यकर्ते ),’ शिवाजी महाराज ‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू -२ प्रतापसिंह ‘यांनी राज्य केले.

मुस्लिम राज्‍यकर्त्‍यांनी ई.स.१२९६ मध्‍ये प्रथम जिल्‍हयावर आक्रमण केले. सन १७०७ पर्यंत मुस्लिमांचे अधिपत्‍य होते.सन १६३६ साली निजामशाहीचा अस्‍त झाला.

Ch Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज

मराठयांचा राज्‍यातील सुवर्णकाळ : छत्रपती शिवाजी महाराज

शहाजी राजांचा मुलगा व मराठा राज्‍याचे संस्‍थापक शिवाजीराजे यांनी आपली सत्‍ता उत्‍तर पुण्‍याच्‍या डोंगराळ भागांत पुणे आणि सुपा येथे ‍स्थापन करण्‍यास सुरुवात केली.त्‍यापुर्वी तिथे त्यांचे वडील शहाजीराजे यांची सुभेदारी होती.

शिवाजी महाराजांच्‍या सत्‍तेच्‍या काळातील सर्वात मोठया घडामोडी या पुणे आणि सातारा या परिक्षेत्रातच विशेषकरुन सहयाद्रींच्‍या पर्वत रांगांभोवतीच घडल्‍या.जिल्‍हयाचा पश्चिमेकडील भुभाग पुर्णतः घनदाट जंगले, उंच टेकडयांनी व्‍यापलेला असल्‍या कारणाने शिवाजी महाराजांनी तिथे सुमारे २५ किल्‍ले स्‍थापन केले. त्‍यांनी संपुर्ण आयुष्‍यभर आदिल शहा व मुघलांशी लढा दिला.‍शिवाजी महाराज यांच्‍या या वाढत्‍या पराक्रमामुळे आदिल शहाने विजापुरचा महाकाय सरदार अफझल खानास धाडले.त्‍यावेळी त्‍याच्‍या बरोबर अफाट सैन्‍य होते.तो लोकांना छळत व पंढरपुर व तुळजापुरातील मंदीरांची नासधुस करीत आला.त्‍याचा ऐतिहासिक पराभव व शेवट उंच विशाल आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्‍या प्रतापगडावर (पुर्वी भोरप्‍याचा डोंगर) झाला.

सन १६६३मध्‍ये शिवाजी महाराजांनी परळी आणि सातारा असे दोन किल्‍ले मिळवले.त्‍यांनी त्‍यांचे गुरु श्री समर्थ रामदास स्‍वामी यांना परळीच्‍या किल्‍ल्‍यावर रहाण्‍याची विनंती केली होती.कालांतराने त्‍या किल्‍ल्‍याचे नामकरण सज्‍ज्‍नगड असे झाले.सातारा शहरापासुन १२किमी च्‍या अंतरावर सज्‍ज्‍नगड हा किल्‍ला आहे.सातारा शहर हे अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍याच्‍या पायथ्याशीवसलेले आहे.शिवाजी महाराजांच्‍या मृत्‍युनंतर औरंगजेबाने अजिंक्‍यतारा हा किल्‍ला मिळवला.कालांतराने परशुराम प्रतिनिधी यांनी सन १७०६ मध्‍ये तो पुन्‍हा मिळवला.सन १७०८मध्‍ये शाहु महाराजांनी या किल्‍ल्‍यावर पुन्हा ताबा मिळवला.

सातारा जिल्ह्याच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्‍थळावर क्लिक करा. :-

महाराष्ट्र शासन -शासकीय वार्तापत्र विभाग

( सौजन्य: महाराष्ट्र शासन संकेतस्थळ )