Close

वॉटर कप-2018

*सत्यमेव जयते वॉटर कपवर टाकेवाडीने कोरले नाव*

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावाने पाणी ही चळवळ म्हणून राबवित आहेत ; त्याचे फळ शाश्वत पाणी साठ्यात मिळत आहे. या वर्षीच्या सत्यमेव जयते फौंडेशनच्या वतीने जी वाटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी ( आंधळी ) या गावाने राज्यातले प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले ….आज (12/08/2018) बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात हे प्रथम क्रमांकाचा कप मोठ्या जलोषात स्विकारला … हा पुरस्काराने पुन्हा सातारा जिल्ह्यातील लोक चळवळीचे महत्व अधोरेखित झाले … या मनाचे आणि डोळ्याचे पारने फेडणा- या पुरस्कार सोहळ्याचे सोनेरी क्षण सातारा जिल्हा माहिती कार्यालयाचे विष्णु शिंदे यांनी त्यांच्या कैम-यात कैद केले …. समस्त सातारकराना अभिमान वाटणारा पुरस्कार सोहळा तुमच्या सोबत शेअर करत आहोत …. !!
टाकेवाडीकरांचे खुप खुप अभिनंदन .. !!

– * द्वारा जिल्हा माहिती कार्यालय, सातारा*