Close

महाबळेश्वर

दिशा

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे.महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते. येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उदयाने, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. ब्रिटीश-कालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती या आजही त्यावेळच्या ब्रिटीश राजवटीची ओळख करून देतात. मार्च ते जून हा कालावधी महाबळेश्वरला भेट देण्यास योग्य आहे.

येथील प्रेक्षणीय ठिकाणांना ‘पॉईंट’ म्हणतात. बहुतांशी ‘पॉईंट’ हे डोंगराच्या टोकालाच आहेत.

आर्थर सीट पॉईंट

महाबळेश्वरातील सर्वात प्रसिद्ध पॉईंट म्हणून ओळखला जातो. या पॉईंटच्या डावीकडे खोल दरीतून कोंकणात जाणारीसावित्री नदी आहे तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत यालाच ब्रम्हारण्य असेही म्हणतात हि सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पडायला भाग पाडतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला ,तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर ‘टायगर स्प्रिंग’, ‘इको पॉईंट’, ‘एलफिस्टन पॉईंट’ आहेत.

ईको पॉईंट

आर्थर पॉईंटच्या मार्गावरच मनमोहक ,आरोग्यदायक आणि नैसर्गिक दृष्टया समृद्ध असा ईको पॉईंट आहे.इथे खोल दऱ्या, उंच पर्वत पहावयास मिळतात.

वेण्णा लेक

सन १८४२ साली,सातारचे राजे श्रीमंत छ.आप्पासाहेब महाराज यांनी ‘वेण्णा लेक’ची निर्मिती केली.वेण्णा लेकचा विस्तार सुमारे २८ एकर क्षेत्रात असून त्याची सरासरी खोली १०फुट आहे.तसेच बारमाही वाहणाऱ्या झऱ्यामुळे येथील उदयाने व बगीचे फुलले आहेत.यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या येथील सौंदर्यात आणखीनच भर टाकली गेली आहे.तलावा भोवतालचा संपूर्ण परिसर झाडे, हिरवळ आणि फुलांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यानंतर येथे भरपूर पाणी साठा असतो. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्याची हीच योग्य वेळ आहे.हे ठिकाण पाचगणीच्या एस.टी.बस स्थानकापासून सुमारे २ किमी अंतरावर आहे.

 

फॉकलंड पॉईंट

येथून खोल दरीमधल्या कोयना नदीचे दर्शन होते.तसेच या ठिकाणाहून मावळत्या सूर्याचे दर्शन त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकते.

 

लिंगमळा वाटर फॉल

हे सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे.तसेच हा पॉईंट पांचगणी रस्त्याला वेण्णा लेक पासून अत्यंत जवळ आहे.

 

बॉम्बे पॉईंट

हा महाबळेश्वर मधील सर्वात प्रसिद्ध पॉईंटआहे.सर्व पर्यटक इथे मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्याकरिता येत असतात.यालाच ‘सनसेट’ पॉईंट असेही संबोधतात.

 

श्रीक्षेत्र महाबळेश्वर

महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव (महाबली) यांच्या नावापासूनच प्राप्त झालेले आहे. जुन्या महाबळेश्वर मध्ये महादेवाचे आहे, यालाच क्षेत्र महाबळेश्वर असेही म्हणतात. महाबळेश्वर पासून ५ किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे.या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत,तसेच १३ व्या शतकातील सर्वात जुने कृष्णाबाई मंदिर आहे.

महाबळेश्वर त्याच्या स्ट्राबेरीसाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच महाबळेश्वर  हे शेत ताज्या स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी यासाठी सुद्धा प्रसिध्द आहे. तसेच आपण  जेली, मध, जाम आणि बरेच काही विकत घेऊ शकता. एखादा हातमाग, चामड्याच्या वस्तू, कोल्हापुरी पादत्राण ई. वस्तू  टाउन बझारमधून खरेदी करू शकतो.

छायाचित्र दालन

  • हत्ती माथा
  • आर्थर सीट पॉईन्ट
  • इको पॉईन्ट
  • कृष्णामाई मंदिर, महाबळेश्वर
  • वेण्णा तलाव
  • महाबळेश्वरची जगप्रसिद्ध स्ट्राबेरी

कसे पोहोचाल? :

विमानाने

महाबळेश्वर हे पुणे विमानतळापासून 130 किमी अंतरावर आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 271 किमी दूर आहे.

रेल्वेने

महाबळेश्वर हे पुणे रेल्वे स्टेशनपासून 124 कि.मी. अंतरावर आहे आणि सातारा रेल्वे स्टेशनपासून 61 किमी अंतरावर आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनपासून 178 कि.मी. दूर आहे.

रस्त्याने

महाबळेश्वर हे पुणे पासून 121 किमी दूर आणि सातारा पासून 56.6 किमी दूर आणि कोल्हापूर पासून 178 किमी दूर आहे.