प्रतापगड
श्रेणी ऐतिहासिक
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे. छ.शिवाजी महाराजांनी’ तुळजा-भवानी’ मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते. या किल्ल्यावरून कोंकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल? :
विमानाने
सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे. प्रतापगड हे पुणे विमानतळापासून 148 किमी अंतरावर आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 2224 किमी दूर आहे
रेल्वेने
रेल्वेने आल्यास सातारा रेल्वे स्थानक येथे उतरावे.
रस्त्याने
प्रतापगड सातार्यापासून 81 किमी दूर आहे.