जिल्हा पुनर्वसन विभाग
I) सातारा जिल्हयात पुनर्वसन विभागाचे कार्यक्षेत्र असलेले पुढीलप्रमाणे प्रकल्प आहेत :- 1. कोयना धोम 3. कण्हेर 4.येरळवाडी 5. वीर 6. उरमोडी 7. महू हातगेघर 8. उत्तरमांड 9. मोरणा गुरेघर 10. धोम बलकवडी 11.महिंद 12. निरा देवधर 13. वांग मराठवाडी 14. तारळी 15. आंधळी 16. येवती म्हासोली 17. नागेवाडी 18. टेंभू 19. निवकणे 20. आंबळे 21. चिटेघर 22. बिबी 23. आसरे रेणावळे बोगदा 24. कुसवडे ल.पा. 25 काळगाव ल.पा.
II) या सर्व प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन शाखेकडे स्वतंत्र/एकत्रित संकलने
असून प्रत्येक संकलनाकडे खालील नमूद केलेले कामकाज असते.
- प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र जाहीर करणे व त्यानुसार गाववार बाधित खातेदारांच्या संकलन याद्या तयार करणे.
- संकलन यादी नुसार प्रत्येक खातेदारास देय पर्यायी जमीन व भूखंडाबाबतची माहिती संकलित करणे.
- लाभक्षेत्रात समाविष्ठ होणाऱ्या गावांचे क्षेत्र जाहीर करणे.
- बंदी दिनांकास लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांची माहिती संकलित करणे.
- प्रकल्पग्रस्त खातेदारांना लाभक्षेत्रातील जमीनीचे वाटप करणे.
- पुनर्वसित गावठाणातील भूखंडाचे प्रकल्पग्रस्तांना वाटप करणे.
- बुडीत क्षेत्रातील व लाभक्षेत्रातील ७/१२ वर हस्तांतरणास बंदी बाबतच्या नोंदी घेणे.
- बुडीत क्षेत्रातील प्रकल्पास आवश्यक असणाऱ्या क्षेत्राचे संपादन पूर्ण झाल्यावर बुडीत क्षेत्राबाहेरील ७/१२ वर नोंदविणेत आलेल्या बंदीबाबतचा शेरा उठविणे.
- बाधीत खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त दाखला देणे/हस्तांतर करणे.
- पर्यायी जमीनीचे खरेदी विक्रीसाठी परवानगी देणे.
- नविन शर्त कमी करणे.
- प्रकल्पग्रस्त दाखल्यांच्या नोकरी संकलन नोंदवहीत नोंदी घेणे.
- लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र जमीनींच्या संपादनाबाबत मूळ खातेदारांनी दाखल केलेल्या दाव्याच्या कामी विविध कोर्टात सुनावणीस हजर रहाणे.
- प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाकडून वारंवार होणारे मोर्चे, उपोषणे, आंदोलने व आत्मदहने याबाबत वेळोवेळी सज्ज रहाणे.
- पुनर्वसन कार्यालयातील अभिलेखात असणाऱ्या जीर्ण कागदपत्राबाबत सातत्याने व्यवस्था पहाणे व ती सुस्थितीत ठेवणे.
- प्रकल्प आस्थापनांकडून प्राप्तं पुनर्वसित गावठाणातील विविध नागरी सुविधांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणे.
- वहिवाट अडथळा केसेसचे कामकाज करणे. (उपविभागीय अधिकारी स्तरावर कामकाज चालते.)
III) सातारा जिल्हयातील सर्व पुनर्वसन प्रकल्पांचे जमीन / भूखंड वाटप करणेकामी नेमून दिलेले
अधिकारी खालीलप्रमाणे आहेत :-
अ.क्र. |
प्रकल्पाचे नाव |
जमीन/भूखंड वाटप अधिकारी |
१ |
धोम/कण्हेर/कोयना/वीर/नागेवाडी/येरळवाडी/ निरा देवधर/आंधळी |
उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सातारा |
२ |
उरमोडी |
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. १६ |
३ |
महू हातगेघर |
उपविभागीय अधिकारी, सातारा |
४ |
धोम बलकवडी/आसरे रेणावळे बोगदा प्रकल्प |
उपविभागीय अधिकारी, वाई |
५ |
उत्तरमांड/मोरणा गुरेघर/ महिंद |
उपविभागीय अधिकारी, पाटण |
६ |
तारळी/वांग मराठवाडी |
उपविभागीय अधिकारी, कराड |
IV) पुनर्वसन शाखेशी संबंधित महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार अधिसूचित
सेवांबाबतचा तपशिल :-
कार्यालयाचे नाव :- जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा (पुनर्वसन शाखा)
अ.क्र. |
अधिसूचित लोकसेवा तपशिल |
लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा |
लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क |
पदनिर्देशित अधिकारी |
प्रथम अपिलीय अधिकारी |
द्वितीय अपिलीय अधिकारी |
1 |
प्रकल्पग्रस्त दाखला |
30 |
नि:शुल्क |
तहसिलदार/ उपविभागीय अधिकारी/ जिल्हा पुनर्वसन अधिकारी |
अपर जिल्हाधिकारी |
विभागीय आयुक्त |
तृतीय व अंतिम अपिल राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयाोग, पुणे महसुली विभाग, पुणे यांचेकडे करता येईल. आयोगाच्या कार्यालयाचा ई-मेल आयडी व दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहे.
E- Mail- crtspune@maharashtra.gov.in
दूरध्वनी क्र. ०२० – २९९५०६६३
V) सातारा जिल्हयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेली माहिती खालीलप्रमाणे :-
(satara.gov.in-Notice-Announcements)
- जमीन / भूखंड मागणी अर्जाचा नमुना
ब) वाटपासाठी उपलब्ध पुनर्वसन जमिनीचा भूसंचय (प्रकल्प, गावनिहाय व आराखडयानुसार)