शिवाजी संग्रहालय, सातारा
श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय(सातारा)
सातारा जिल्हा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा असून पूर्वी मराठा राज्याची राजधानी म्हणून ओळखला जायचा. इथे सन १८३९ सालापर्यंत छ.शिवाजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यानी राज्य केले. प्रामुख्याने येथील संग्रहालय आणि ऐतिहासिक स्थळे प्रामुख्याने लोकांना प्रेरणादायी वाटतात.सन १९६६ साली या संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व सन १९७० साली त्याचे काम पूर्ण झाले.या संग्रहालयाचे उदघाटन श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोंसले यांच्या शुभाशीर्वादाने व तत्कालीन गृहमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते पार पडला.
संग्रहालयाची रचना अशा प्रकारें करणेत आली आहे कि यामधून १७ व्या व १८ व्या शतकातील संस्कृतीचे दर्शन घडते.हे संग्रहालय विशेषतः पुढील दोन विभागामध्ये विभागलेले आहे,प्रदर्शित वस्तु आणि मराठा कला दालन.येथील प्रदर्शित वस्तु प्रामुख्याने पुढील चार भागांमध्ये दिसतात.,
१.शस्त्र विभाग ,२.कोरीव काम विभाग ,३.चित्रकला दालन आणि ४.वस्त्र दालन.
शिवाजी संग्रहालय, सातारा <– चित्र प्रदर्शिनीची एक झलक बघण्यासाठी येथे क्लिक करा.
या संग्रहालयात भरपूर शस्त्रास्त्रे,निरनिराळी वस्त्रे पहावयास मिळतात. संग्रहालयातील प्रत्येक वस्तु इतक्या दिवसांपासून आणि अशा प्रकारे जतन केलेली आहे कि ती प्रत्येक वस्तू छ.शिवाजी महाराज, त्यांचे उत्तराधिकारी या सर्वांचा व मराठा साम्राज्याचा इतिहास सांगतात.
अधिक माहितीसाठी संग्रहालयाच्या उप अभिरक्षकांकडे संपर्क साधावा. फोन-(०२१६२) २ ३८२३५.
संग्रहालय पाहण्याची वेळ स.१०.०० ते दु.१.०० आणि दु.१.३० ते सायं.५.०० सोमवारी बंद
सातारा तालुका
कास तलाव व बामणोली साता-यापासून पश्चिमेला यवतेश्वर मार्गे २७ कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १४३० मी. उंचीवर कास पठार लागतो. या तलावात…
कोरेगाव तालुका
रहिमतपूर तालुका ठिकाण कोरेगाव असले तरी ते लहान असल्यामुळे तेथे ग्रामपंचायत आहे. रहिमतपूर मोठे असल्याने तेथे नगरपालिका आहे. ब्रिटिश काळात…
खटाव तालुका
खटाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे, असे असले तरी सर्व कार्यालये वडूज या ठिकाणी आहेत. पूर्वी संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती….
माण तालुका
दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण आहे. माण हे गावाचे नाव नसून संपूर्ण प्रांताला माण संबोधले जाते. माणदेश हा कायम दुष्काळाची सावट…
फलटण तालुका
फलटण – पूर्वी या गावात मोठ्या प्रमाणात फळफळावर पिकत होती. यावरुन फलस्थानचे फलटण हे नाव पडले. फलटणचे नाईक निबाळकर हे…
खंडाळा तालुका
खंडाळा तालुक्याचे मुख्य ठिकाण हे हरी पारगांव-खंडाळा असले तरी या तालुक्यातील शिरवळ हे महत्वपूर्ण गांव आहे. शिरवळ हे गाव निरा…
जावली तालुका
जावली जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली. जावलीचे मोरे हे इतिहास प्रसिध्द घराणे असून, स्वतःला सम्राट…
महाबळेश्वर तालुका
महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा तो निसर्गरम्य परिसर होय. जुने महाबळेश्वर व नवे महाबळेश्वर असे महाबळेश्वराचे दोन…
वाई तालुका
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते वाई म्हणजे विणकर लोकांची वस्ती होती. डॉ. ह. वि. संकलिया या संशोधकांच्या मते, या गावाचे…
कराड तालुका
कोयनेला करहा असे प्राचीन काळी म्हणत. करहेच्या काठी असलेले करहाटक त्यावरुन करहाट, करहाड, कराड अशी व्युत्पती झाली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे येथे…