Close

जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व्यक्ती (ऐतिहासिक )

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु आणि मार्गदर्शक होते. त्यांचा जन्म मराठवाडयातील जांब येथे इ.स.१६०८ मध्ये झाला.वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी सलग १२ वर्षे अध्यात्माचा अभ्यास केला. त्यानंतर ते १२ वर्षे संपूर्ण देशभर फिरले (तिर्थाटन) उंब्रज जवळील ‘चाफळ’ येथे त्यांनी अध्यात्माची शिकवण देण्यास सुरुवात केली.त्यांनी जवळपास ११०० मठांची स्थापना केली . प्रभू रामचंद्राखेरीज ते हनुमानांचे भक्त होते. त्यांनी अनेक हनुमान मंदिरांचीही स्थापना केली. ‘ दासबोध ‘ आणि ‘मनाचे श्लोक’ या त्यांच्या लिखाणातून त्यांनी मानवधर्माला अनेक शिकवणी दिल्या. महाराष्ट्रामध्ये भगवदगीते नंतर दासबोध ला मानले जाते .त्यांनी फक्त अध्यात्मिक ज्ञानच दिले नाही तर त्याबरोबर जीवन कसे जगावे? याचीही शिकवण दिली. शारीरिक तंदुरुस्ती वर त्यांचा फार भर होता.त्यांच्या नैतिक आधार आणि मार्गदर्शनाच्या जोरावरच छ.शिवाजी महाराजांनी ‘ हिंदवी स्वराज्याची ‘ स्थापना केली. छ.शिवाजी महाराजांनी त्यांना परळीच्या किल्ल्यावर रहाण्याची विनंती केली . कालांतराने त्या किल्ल्याचे नामकरण ‘सज्जनगड’ असे झाले. आजही लाखोंच्या संख्येने भाविक सज्जनगडावर उपस्थित राहून दास-नवमी चा उत्सव साजरा करतात.

 

 

 

 

रामशास्त्री प्रभुणे

रामशास्त्री प्रभुणे

रामशास्त्री प्रभूणेंचा जन्म सातारा जिल्ह्याजवळील ‘माहुली’ येथे झाला . पेशव्यांच्या काळात त्यांना सर्वोच्च न्याय व्यवस्थेचे सर्वाधिकार प्राप्त झाले होते. त्यांनी उच्च नितीमत्ता आणि शील यांची स्थापना केली.१३ डिसेंबर १७७२ रोजी नारायण पेशव्यांचा खुन झाल्यानंतर रघुनाथरावांनी स्वतःला ‘पेशवा’म्हणून जाहीर केले.नारायणरावांच्या खुनाच्या खटल्या संदर्भात न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी रघुनाथरावांना मरणोत्तर फाशीची शिक्षा सुनावली .’रामशास्त्री’ हे नाव त्यांच्या महान धाडसामुळे आणि न्यायामुळे आजही स्मरणात राहिलेले आहे.

 

 

 

 

 

 

श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज

श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज

‘छ. शाहू’ सातारचे राजे आणि छ.शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी यांचे निधन १८१० मध्ये झाल्यानंतर त्यांचा मुलगा ‘प्रतापसिंह’हा उत्तराधिकारी म्हणून विराजमान झाला. त्यांनी त्यांच्या काळात अविस्मरणीय कामगिरी केली. उदा .शैक्षणिक क्षेत्र ,पाणी पुरवठा , सातारा ते महाबळेश्वर रस्ता इ. ‘महाबळेश्वरला’ थंड हवेचे ठिकाण म्हणून स्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.१८३९ पर्यंत त्यांनी राज्य केले.सन १८२३ मध्ये त्यांना रॉयल सोसायटी ऑफ लंडन तर्फे सम्मानित करण्यात आले.

 

 

 

 

 

झाशीची राणी लक्ष्मिबाई

झाशीची राणी लक्ष्मिबाई

लक्ष्मिबाई तांबे यांचा जन्म ‘ धावडशी ‘जिल्हा-सातारा येथे झाला. झाशी येथील नेवाळकर घराण्यात त्यांचा विवाह झाल्यानंतर , त्या झाशीच्या राणी बनल्या.उत्तराधिकारी म्हणून दत्तक मुल याला विरोध करत ब्रिटीश सरकारने झाशीचे संस्थान ब्रिटीश राज्यात विलीन करण्याचे ठरवले. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी ब्रिटीश सरकार विरोधात लढा उभारला. त्या इतक्या शुर आणि धाडशी होत्या की ब्रिटीश सरकारला सुद्धा त्यांच्याशी युद्ध करणे अवघड गेले.’मेरी झांशी नहिं दुंगी’हे त्यांचे घोष वाक्य १८५७ च्या उठावात प्रेरणादायी ठरले.

 

 

 

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील

नानासाहेब रामचंद्र पाटील उर्फ ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ हे भारताच्या स्वातंत्र्य लढयातील अग्रणीचे क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी जवळ-जवळ साडे चार वर्षे (ऑग .१९४३ ते मे १९४६ ) १५० गांवात प्रती सरकार या समांतर सरकारची स्थापना केली (पत्री सरकार ).. ब्रिटीश सरकारशी झुंज देत असताना या देशभक्ताने अनेकवेळा तुरुंगवास भोगला. १९४२ मधील ‘भारत छोडो’च्या आंदोलना दरम्यान ते ४४ महिने अज्ञातवासात राहिले.असहकार चळवळी शिवाय ब्रिटीश सरकारवर सरळ हल्ला करण्याची त्यांची पद्धत जिल्ह्यात कमालीची प्रसिद्ध होती. ६ डिसेंबर १९७६ रोजी त्यांचे निधन झाले.

 

 

 

 

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

भारतातील पहिल्या महिला शिक्षक , सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यामधील खंडाला तालुक्यातील ‘नायगाव ‘ इथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या पत्नी होत्या. देशात त्यांनी महिलांच्या शिक्षणाचा पाया मांडला. विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीचे संपूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त त्यांचेच आहे.

 

 

 

 


जिल्ह्यातील ईतर सुप्रसिद्ध व्यक्ती -राजकीय व इतर (पीडीएफ, ३६७ केबी)