शिवाजी संग्रहालय, सातारा
श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय(सातारा)
सातारा जिल्हा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा असून पूर्वी मराठा राज्याची राजधानी म्हणून ओळखला जायचा. इथे सन १८३९ सालापर्यंत छ.शिवाजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यानी राज्य केले. प्रामुख्याने येथील संग्रहालय आणि ऐतिहासिक स्थळे प्रामुख्याने लोकांना प्रेरणादायी वाटतात.सन १९६६ साली या संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व सन १९७० साली त्याचे काम पूर्ण झाले.या संग्रहालयाचे उदघाटन श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोंसले यांच्या शुभाशीर्वादाने व तत्कालीन गृहमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते पार पडला.
संग्रहालयाची रचना अशा प्रकारें करणेत आली आहे कि यामधून १७ व्या व १८ व्या शतकातील संस्कृतीचे दर्शन घडते.हे संग्रहालय विशेषतः पुढील दोन विभागामध्ये विभागलेले आहे,प्रदर्शित वस्तु आणि मराठा कला दालन.येथील प्रदर्शित वस्तु प्रामुख्याने पुढील चार भागांमध्ये दिसतात.,
१.शस्त्र विभाग ,२.कोरीव काम विभाग ,३.चित्रकला दालन आणि ४.वस्त्र दालन.
शिवाजी संग्रहालय, सातारा <– चित्र प्रदर्शिनीची एक झलक बघण्यासाठी येथे क्लिक करा.
या संग्रहालयात भरपूर शस्त्रास्त्रे,निरनिराळी वस्त्रे पहावयास मिळतात. संग्रहालयातील प्रत्येक वस्तु इतक्या दिवसांपासून आणि अशा प्रकारे जतन केलेली आहे कि ती प्रत्येक वस्तू छ.शिवाजी महाराज, त्यांचे उत्तराधिकारी या सर्वांचा व मराठा साम्राज्याचा इतिहास सांगतात.
अधिक माहितीसाठी संग्रहालयाच्या उप अभिरक्षकांकडे संपर्क साधावा. फोन-(०२१६२) २ ३८२३५.
संग्रहालय पाहण्याची वेळ स.१०.०० ते दु.१.०० आणि दु.१.३० ते सायं.५.०० सोमवारी बंद
पाटण तालुका
पाटण मराठेशाहीत पाटणकर हे ह्या प्रांताचे देशमुख होते. पाटण गावाचे पाटण आणि रामापूर असे दोन भाग आहेत. चाफळ – पाटण…
भाम्बवली वझराई धबधबा
भाम्बावली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ…
भाम्बवली पुष्प पठार
भामबवली पुष्प पठार हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. हे सातारा शहरापासून अंदाजे 30 किमी दूर स्थित आहे. हे पठार उंच…
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले…
पाचगणी
पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ (१८ कि.मी.) अंतरावर असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण…
प्रतापगड
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात…
तापोळा
तापोळा (बोट क्लब) महाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर सहलीसाठी आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना धरणातील शिवसागर…