• साइट मॅप
  • Accessibility Links
Close

रो. ह. यो. विभाग

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक बेरोजगार व्यक्तीला रोजगार ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याची हमी दिली जाते. यामध्ये योजनेअंतर्गत काम करण्यास इच्छुक 18 वर्षावरील सक्षम व्यक्तीला 100 दिवसांपर्यंत रोजगार उपलब्ध करून दिला जातो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या कायदा अंतर्गत एकूण 266 प्रकारची कामे समाविष्ठ आहेत, तसेच मजूरीचा दर 297 रू. आहे. तसेच ग्रामपंचायत विभाग, सामाजिक वनिकरण विभाग, कृषी विभाग, वन विभाग, रेशीम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणा कामकाज करतात. यामध्ये इच्छुक कुटुंबाने मागणी केलेनंतर जॉबकार्ड ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून दिले जाते.
  • सन २०२४-२५ मध्ये दि. २७.१.२०२५ अखेर, ६९८७ कुटुंबाना जॉबकार्ड पुरविणेत आलेले आहेत. त्याचा तालूकानिहाय गोषवारा खालीलप्रमाणे आहे.

सन २०२४-२५ मध्ये दि. २७.१.२०२५ अखेर जॉबकार्ड पुरविणेत आलेल्या कुटुंबांची संख्या

तालुका

कुटुंबांची संख्या 

जावली

205

कराड

1186

खंडाळा

140

खटाव

902

कोरेगांव

536

महाबळेश्वर

221

माण

585

पाटण

970

फलटण

976

सातारा

951

वाई

315

एकूण

6987