अ) केंद्र पुरस्कृत योजना –
अ.क्र. |
योजनेचे नाव |
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक |
1 |
भारत सरकार शिष्यवृत्ती |
उत्पन्नाचा दाखला, 10 वी 12 वी मार्कलिस्ट, अधिवासाचा दाखला, जातीचा दाखला, जातवैधता प्रमाणपत्र |
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यात येतो. |
Mahadbt.gov.in |
2 |
आदर्श ग्राम योजना |
गाव विकास आराखडा |
अनु. जातीची 50 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाची निवड शासनस्तरावरुन करण्यात येते. |
http://pmagy.gov.in/login |
3 |
तृतीयपंथीय कल्याण व त्यांचे हक्कांचे संरक्षण |
पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड |
अर्जदार स्वत: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास अर्ज सादर करु शकतात. |
ऑनलाईन (TG PORTAL) |
4 |
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम |
पिडीताचा जातीचा दाखला, पोलीस स्टेशनमधील प्रथम खबर अहवाल व आवश्यक असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, घटनास्थळाचा पंचनामा, दोषारोप पत्र, बँक पासबुक, आधारकार्ड |
संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांचेकडे सादर करण्यात येतात. |
ऑफलाईन |
ब) राज्य पुरस्कृत योजना –
अ.क्र. |
योजनेचे नाव |
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक |
1 |
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना |
जातीचा दाखला, भूमीहीन प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला, |
अर्जदार स्वत: संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास अर्ज सादर करु शकतात. |
ऑफलाईन |
2 |
गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल |
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जागेचा उतारा, रहिवासी दाखला |
अर्जदार स्वत: संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास अर्ज सादर करु शकतात. |
ऑफलाईन |
3 |
स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप |
बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, बचत गटातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बचत गटाकडील बँक खात्याचा तपशील |
अर्जदार स्वत: संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास अर्ज सादर करु शकतात. |
ऑफलाईन |
4 |
स्टँड अप योजना (मनी मार्जिन योजना) |
जातीचा दाखला, प्रकल्प अहवाल, बँकेकडील कज्र मंजूरीचे पत्र, बँकेकडील चालू खाते व कर्ज खात्याचा तपशील, |
अर्जदार स्वत: संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास अर्ज सादर करु शकतात. |
ऑफलाईन |
5 |
मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृहे |
मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कलिस्ट, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला |
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केली जाते. तर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होते. अर्जदार विद्यार्थी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांचेकडे अर्ज सादर करतात. |
hmas.mahait.org |
अ.क्र. |
योजनेचे नाव |
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक |
6 |
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा |
मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कलिस्ट, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला |
अर्जदार विद्यार्थी संबंधित निवासी शाळेचे मुख्याध्यापक यांचेकडे अर्ज सादर करतात. |
ऑफलाईन |
7 |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार |
10 वी 12 वी मार्कलिस्ट, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधारकार्ड |
अर्जदार स्वत: संबंधित शाळा / महाविद्यालय तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास अर्ज सादर करु शकतात. |
ऑफलाईन |
8 |
सैनिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता |
जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधारकार्ड |
सैनिक शाळेमार्फत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्यात येतात. |
ऑफलाईन |
9 |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना |
जातीचा दाखला, लगतच्या वर्षाचे मार्कलिस्ट, उत्पन्नाचा दाखला, भाडे करारनामा |
संबंधित महाविद्यालय तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांचेकडे अर्ज करण्यात येतात. |
ऑफलाईन |
10 |
रमाई आवास योजना (ग्रामीण) |
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जागेचा उतारा, स्वयंघोषणापत्र, आवश्यक ते संमती पत्र |
गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयास सादर केले जातात. |
ऑफलाईन |
11 |
रमाई आवास योजना (शहरी) |
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जागेचा उतारा, स्वयंघोषणापत्र, आवश्यक ते संमती पत्र |
मुख्याधिकारी, नगरपालिका यांचेमार्फत संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयास सादर केले जातात. |
ऑफलाईन |
12 |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना |
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जागेचा उतारा, स्वयंघोषणापत्र, आवश्यक ते संमती पत्र |
विद्यमान खासदार व आमदार यांचेमार्फत शिफारस केलेली कामे शासनस्तरावरुन सदर योजनेंतर्गत मंजूर केली जातात.
|
ऑफलाईन |
अ.क्र. |
योजनेचे नाव |
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक |
13 |
मुख्यमंत्री वयोश्री योजना |
आधारकार्डची छायाप्रत, बँक पासबुकची छायाप्रत, पासपोर्ट साईज आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र |
अर्जदार स्वत: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास अर्ज सादर करु शकतात. |
ऑफलाईन |
14 |
ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण / नोंदणी करुन ओळखपत्र देणे |
शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, बॅक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, शेत जमीन असल्यास / नसल्यास त्या संबंधीचा उतारा, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, लाभार्थ्यास आजार असल्यास त्यासंबंधीचा दाखला, संबंधित गावातील ग्रामसेवक यांनी दिलेले ऊसतोड कामगारांचे ओळखपत्र |
संबंधित ग्रामसेवक यांनी ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करुन संबंधित ऊसतोड कामगारांचे नोंदणीकरीता अर्ज भरुन घेणे. |
ऑफलाईन |
15 |
अंध व दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने व सवलतीने शासकीय जमीन देणेबाबत |
रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला/ जन्माचा दाखला, शैक्षणिक सर्व कागदापत्रे, रेशनकार्ड, मतदान कार्ड,आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, स्मार्ट कार्ड, जागा मागणीच्या अनुषंगाने जागेचा उतारा, गतीमंद/ मतीमंद असल्यास कायदेशीर पालकत्व स्विकारलेबाबत प्रमाणपत्र |
अर्जदार स्वत: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास अर्ज सादर करु शकतात. |
ऑफलाईन |