Close

जिल्ह्याविषयी

भौगोलिक तपशील

सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील बाजूस स्थित आहे .सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे , पूर्वेला सोलापूर, दक्षिणेला सांगली आणि पश्चिमेला रत्नागिरी जिल्हा व उत्तर-पश्चिमेला रायगड जिल्हा आहे.

सातारा जिल्हा भीमा आणि कृष्णा नदींच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. हा जिल्हा विविध प्रकारच्या भूभागांनी बनलेला असून आल्हाददायक हवामान ,जंगले इ.चा परिणाम जिल्ह्याच्या भौतिक परिस्थितीवर बघावयास मिळतो. सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा ,शिखरे आणि उंच पठारांनी वेढलेला आहे.या पर्वत रांगांची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फुट आहे.तसेच फलटण तालुक्यातील नीरा नदीच्या खोऱ्या पासूनची उंची हि समुद्रसपाटीपासून १७०० फुटांपेक्षा जास्त आहे..हवामानाच्या बाबतीत महाबळेश्वर तालुक्याचा प्रभाग अधिक पाऊस पडणाऱ्या विभागात येतो.तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६००० मिमी असून माण व खटाव चा विभाग हा कोरड्या क्षेत्रात येतो.व तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ५०० मिमी आहे.जिल्ह्यातील पश्चिमेकडील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी जंगले आहेत तर पूर्वेकडील इतर भूभाग हा खुरट्या झुडपांनी व्यापलेला आहे.

भौगोलिक स्थान : उत्तरेला १७.५ ते १८.११ अक्षांश पूर्वेला ७३.३३ ते ७४.५४ रेखांश

भौगोलिक क्षेत्र १०४८० (स्क्वे.कि.मी.)

सातारा जिल्ह्यातील नद्या

कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा हि दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमी चा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते. कुडाळी ,उरमोडी,वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील उप नद्या आहेत.कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये प्रमुख मदत करणाऱ्या दोन उपनद्या आहेत.

सांख्यिकी तपशील : –

जिल्हा परिषद : १

  1. सातारा

तहसील (११) :

  1. सातारा
  2. कराड
  3. वाई
  4. महाबळेश्वर
  5. फलटण
  6. माण
  7. खटाव
  8. कोरेगांव
  9. पाटण
  10. जावली
  11. खंडाळा

पंचायत समिती (११) :

  1. सातारा
  2. कराड
  3. वाई
  4. महाबळेश्वर
  5. फलटण
  6. माण
  7. खटाव
  8. कोरेगांव
  9. पाटण
  10. जावली
  11. खंडाळा