Close

जिल्हा निवडणूक विभाग

निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत. निवडणूक कार्यालय हे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवडणूक व आस्थापना प्रकरणाशी संबंधित दैनंदिन कार्यात सहाय्यता प्रदान करते.

संबंधीत कर्मचारी:-

  • उपजिल्हा निवडणूक अधिकारी -1
  • नायब तहसिलदार-1
  • अव्वल कारकुन-1
  • लिपिक-1
  • शिपाई-1

या व्यतिरिक्त मतदार संघ स्तरावर निवडणूक संदर्भातील कामकाज करणेकरिता मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि बूथ स्तर अधिकारी त्यांना सहकार्य करतात.

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांचे अधिनस्त सातारा जिल्हयामध्ये खालील 08 मतदार संघ आहेत.

  1. 255 – फलटण (अ.जा)
  2. 256 – वाई
  3. 257 – कोरेगाव
  4. 258 – माण
  5. 259 – कराड उत्तर
  6. 260 – कराड दक्षिण
  7. 261 – पाटण
  8. 262 – सातारा

      उपरोक्त कार्यालयामार्फत केले जाणाऱ्या निवडणूक कामकाजाचे मा. जिल्‍हाधिकारी साो यांचे वतीने पर्यवेक्षण व समन्वय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा) कार्यरत आहे. सदर शाखेकरिता सदयस्थितीत श्री भगवान कांबळे हे उपजिल्हाधिकारी निवडणूक  म्हणून कार्यरत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा), सातारा यांचे कार्यालयाचे कामकाज

  1. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ,
  2. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक,
  3. पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणूक संबंधी कामकाज
  4. जिल्ह्यातील विशेष सहकारी संस्थाचे संबंधाने प्रशासकीय कार्यवाही करणे.
  5. मतदार याद्या अद्यावातीकरण करणे
  6. भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार मतदान केंद्रे तयार आणि पुनर्रचना करणे
  7. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार ओळखपत्र तयार करणे.

 

जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्राची माहिती

सातारा जिल्ह्यात एकूण 8 विधान सभा क्षेत्रे आहेत. विधान सभा क्षेत्र निहाय पुरुष, स्त्रि मतदारांची संख्या व मतदान केंद्रांची माहिती खालील प्रमाणे आहे; (दिनांक 31/10/2024 नुसार )

 

अ.क्र.

विधानसभा क्षेत्राचे नाव

पुरुष मतदाराची संख्या

स्त्रि मतदाराची संख्या

तृतीय पंती मतदाराची संख्या

एकूण मतदारांची संख्या

 

मतदान केंद्राची संख्या

1

255- फलटण

172940

166708

14

339662

355

2

256- वाई

173647

173435

8

347090

471

3

257- कोरेगाव

162731

158388

3

321122

365

4

258- माण

184229

176424

9

360662

388

5

259-कराड उत्तर

155359

150837

7

306203

356

6

260-कराड दक्षिण

160002

155386

32

315420

342

7

261-पाटण

156792

153168

3

309963

424

8

262-सातारा

171372

171262

38

342672

464

एकूण

 

1337072

1305608

114

2642794

3165

 

महत्वाची संकेतस्थळे

भारत निर्वाचन आयोग ( https://www.eci.gov.in/)

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य ( https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/)

निवडणूक मतदारांचे नाव शोधणे (https://electoralsearch.eci.gov.in/)

मतदाता सेवा पोर्टल (https://voters.eci.gov.in/)

 

डिजिटल नकाशा (सातारा विधानसभा मतदारसंघनिहाय)

Digital Map (Satara Assembly Constituency Wise)